मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करत पाथर्डीमध्ये राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा!

पाथर्डी दि.१४ जून (प्रतिनिधी): मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस पाथर्डी तालुक्यातील मनसे पदाधिकऱ्यांनी शहराजवळील मोहरी येथील मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करून या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ म्हणाले की “वाढदिवसाला फ्लेक्स अथवा इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा या निष्पाप मुलांच्या पोटात दोन घास घालणे व यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवने हेच खरे पुण्याचे काम असून राज साहेबांवर आता शस्त्रक्रिया होत असताना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी या मुलांची दुवा मिळेल या उद्देशाने हा कार्यक्रम येथे घेतला आहे.
मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे म्हणाले की ” वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक उपक्रम करता येऊ शकतात पण या अनाथ व मतिमंद मुलांसोबत वाढदिवस साजरा करणे यात वेगळेच मानसिक समाधान मिळते तसेच येथील सर्व शिक्षकांचे कार्य महान असून या सर्व मुलांची येथील शिक्षकवृंद
मनापासून सेवा करत आहेत हे खुप पुण्याचे व भाग्याचे काम आहे मी मा.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देतो. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट,शहर उपाध्यक्ष राजू गिरी,शहर सचिव संदीप काकडे,विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार पारखे,विद्यार्थी सेनेचे उपतालुकाध्यक्ष तेजस पटवा,सौरभ एडके,राहुल तरटे,ओम शेळके यांसह सर्व शिक्षक, विदयार्थी उपस्थीत होते.
प्रास्ताविक श्री शिरसाट सर तर आभार दत्तात्रय कोलते सर यांनी मानले.