सामाजिक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज १६ डिसेंबर रोजी सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात भव्य व गौरवशाली वातावरणात लोकार्पण

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर अहिल्यानगरवासीयांची २००७ पासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होत असून हा ऐतिहासिक सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे यांच्या शुभहस्ते दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार श्री. सुजय विखे, जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, मनपा आयुक्त श्री. यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या पूर्णाकृती पुतळा व चौथऱ्याचे काम पूर्ण झाले असून, सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासक श्री. यशवंत डांगे, पुतळा कृती समितीचे सदस्य व मनपाचे अधिकारी यांनी पाहणी करून कार्यक्रमाचे नियोजन केले. नगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव २००७ मध्ये दिवंगत नगरसेवक श्री. कैलास गिरवले यांनी मांडला होता. दीर्घ काळानंतर या ऐतिहासिक कार्याला गती देण्यात मनपा आयुक्त श्री. यशवंत डांगे यांनी मोलाची भूमिका बजावली.
यावेळी मनपा अभियंता श्री. परिमल निकम, शहर अभियंता श्री. मनोज पारखे, श्री. साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. संपत बारस्कर, माजी उपमहापौर श्री. गणेश भोसले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समितीचे श्री. अजिंक्य बोरकर, श्री. वैभव वाघ, श्री. संतोष लांडे, श्री. सतीश बारस्कर, श्री. सचिन जगताप, श्री. गजानन भांडवलकर, श्री. किरण बारस्कर, श्री. बाळासाहेब निकम, श्री. जय दिघे, श्री. विजय सुंबे, श्री. राजेंद्र ससे, श्री. कुमार नवले, श्री. विश्वास शिंदे, श्री. आशिष काळे, श्री. अमोल गाडे, श्री. संदीप थोरात, श्री. विशाल मस्के, श्री. आशुतोष बांगर, भाजपाचे श्री. मुकुल गंधे तसेच विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे