मिरजगावात वैचारिक क्रांती! सत्यशोधक विवाहाची चर्चा!

मिरजगावात वैचारिक क्रांती! सत्यशोधक विवाहाची चर्चा!
अहमदनगर (महेश भोसले) कर्जत तालुक्यातील मिरजगाव हे बाजाराचे गाव त्यामुळे काही अनोख्या घटना किंवा वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा तर होणारच! जातीच्या पलीकडे रूढी परंपरेला तिलांजली देत, मिरजगावात वैचारिक क्रांती घडवून आणत सत्यशोधक पद्धतीने झालेल्या विवाहाची चर्चा खरे तर गावातच नाही तर तालुक्यात होत आहे.
संकेत आणि आरती हे दोघे उच्चशिक्षित तरुण,तरूणी दोघांचे तसे प्रेम संकेत माळी समाजाचा तर आरती मागासर्गीय असे असल्यावर कमी,आधिक विरोध होणे तर स्वभाविकच आहे.कारण आपले समाजमन सदृढ विचार करायला आजही तयार झाले नाही.मग नातेवाई मंडळी कडून आम्हाला मान दिला नाही.या बरबटलेल्या कुजाट विचारांचा ठेका तर असतोच!
असो या सर्व विषयाला छेद देत गावातील काही सामजिक कार्यकर्त्यांनी मनावर घेत विवाह करण्याचा निर्णय घेतला.याबाबत दोन कुटुंबही तयार झाले.खरतर हा विवाह म्हणजे आरती आणि संकेत चे विचार जुळण्याचा किंवा दोन कुटुंब एकत्र येण्याचा विषय नव्हता तर या अनोख्या विवाहामुळे दोन समाज एकत्र आले आहेत. हा विचार तसा खूप मोठा आहे.म्हणूनच सत्यशोधक पद्धतीने झालेल्या या विवाहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते.एक प्रकारे ही जाती अंताची नांदी आहे.या विवाहप्रसंगी विधीकर्ते भीमराव कोथमबिरे यांनी विचार मंचावरील सर्व पुरोगामी विचार असलेल्या महापुरुषांना अभिवादन करत,नवविवाहीत संकेत व आरती यांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवत विवाह सोहळा पार पडला.याप्रसंगी मुलीचे आई, वडील बाबा घोडके, भाऊ संकेत घोडके,डॉ.अर्चना भिंगारदिवे, ज्येष्ठ नागरीक पद्मा भोसले,संपादक महेश भोसले,सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्ष गौतमी भिंगारदिवे,निजाम पठान,गंगादादा बोरुडे,संपत बावडकर सर,सदाबापू शिंदे,पोपटराव खोसे,उद्धवशेठ नेवसे,राजेंद्र गोरे सर,डॉ.चंद्रकांत कोरडे,डॉ.पंढरीनाथ गोरे,झांबरे महाराज,डॉ.रमेशचंद्र झरकर, प्रा.घोडके,विकास सुद्रिक,कांबळे साहेब,बँक ऑफ महाराष्ट्र चे सागर नाईक,बाळू घोडेस्वार,रेवण घोडके(श्रीगोंदा),प्रशांत बुद्धिवंत,संदीप बुद्धिवंत,अमृत लिंगडे त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व जाती धर्माचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.