प्रशासकिय

शासकीय सुट्टीच्या दिवशी महावितरण लागले कामाला

मनीषा लहारे( केडगाव प्रतिनिधी)
२४ तास असणाऱ्या सेवांपैकी महावितरण वीज महामंडळाच्या गलथान व भोंगळ ,अपारदर्शक कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतो. नियमावली माहित नसल्याने कार्यालयाचे फेरे चालू होतात. रेल्वे स्टेशन परिसरातील भीम नगर येथील तक्रारीची दखल केडगाव जागृक नागरिक मंच यांनी घेऊन महाशिवरात्रीच्या सुटीच्या दिवशी महावितरण येथे दाखल झाला.
Govt. of India Notification पेपर वर नियम Hightlight करत कर्मचार्यांना दाखवण्यात आले. नवीन वीज मीटर साठी अर्ज आल्यानंतर शहरी भागात १५ दिवसांत व ग्रामीण भागात ३० दिवसांत वीज जोडणी देणं कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. तदनंतर विलंबासाठी महावितरणला दंडाची तरतूद आहे.
४ महिने अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या केडगाव विभातील जबाबदार अधिकाऱ्याच्या पगारातून सदर ग्राहकाला दंडाची रक्कम देण्यासाठी मंचाने पाठपुरावा करून तत्काळ वीज मीटर जोडणी देऊन ग्राहकाची अडचण दूर केली आहे .
याप्रसंगी मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे मंचचे सदस्य प्रविण पाटसकर , मनीषा लहारे उपस्थित होते .
ज्यांनी ४००० रु .अथवा अधिकची मीटर सहीत अनामत रक्कम भरली आहे व स्वतःचे वैयाक्तिक मीटर टेस्टींग करून बसवले आहे. त्यांनी महावितरण कडून नवीन मीटर उपलब्ध करून घ्यावे व ते न मिळाल्यास तसेच ज्यांचे वीज कनेक्शन १५ दिवस उलटूनही मिळाले नाहीत अशांनी भरलेली अनामत रक्कम पावती केडगाव जागरुक नागरिक मंचाच्या ८२०८९५४९२५ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावी असे आवाहन मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे