
कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पवार हे कर्जत येथे आले होते. चार प्रभागातील उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. एवढेच नव्हे तर ज्या चार प्रभागातील उमेदवार अर्ज भरणार होती, त्यांच्यासोबत ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दरम्यान, पवार यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र पुरेशी काळजी घेता यावी, यासाठी पुणे येथे एका खासगी रुग्णालयांमध्ये ते दाखल झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या तपासण्या करून घ्याव्यात व काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.