देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुंबई दि.11 – राजधानी दिल्लीतील ऐतिहासीक लालकिल्या समोर एका वाहनात झालेल्या स्फोटाची घटना अत्यंत विदारक आहे.या स्फोटाचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो.या स्फोटा मागे पाकिस्तानचाच हात आहे.त्यामुळे आंतकवादी राष्ट्र असणान्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
दिल्लीतील लालकिल्ल्यासमोर वाहनात स्फोटकांचा झालेला स्फोट अत्यंत भीषण आहे.त्यात अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले.अनेक जण जखमी झाले.जे नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण भावपुर्ण श्रध्दांजली वाहतो.त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत.जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावे अशी मी मंगल कामना करतो असे ना.रामदास आठवले म्हणाले.या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आहेत.या स्फोटामागे जे कोणी आतंकवादी आहेत.त्यांना लवकरात लवकर अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे.सतत आतंकवादी घटना घडविणाऱ्या
आतंकवादी हल्ले ; आतंकवादी स्फोट घडविणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
या स्फोटात जे मृत्यमुखी पडलेत,जखमी झालेत त्यांना सरकारच्या वतीने निश्चित मदत देण्यात येईल.लाल किल्ल्यात झालेल्या स्फोटाचा बदला भारत निश्चित घेईल असे ना.रामदास आठवले म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा