निधन
शोले चित्रपटातील ‘जय बिरू’ची दोस्ती संपली बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘ हि – मॅन’ धर्मेद्र यांनी घेतला वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: मुबंई: दि. 11 नोव्हेंबर: शोले चित्रपटातील ‘ जय बीरू ‘ ची दोस्ती संपली.
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘ हि- मॅन’ धर्मेंद्र यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान आणि लोकप्रिय अभिनेता होते, त्यांनी आपल्या दमदार अभिनय, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि प्रेक्षकांवरील अपार प्रेमामुळे ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ अशी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली या गावात झाला. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी ‘फूल और पत्थर’ (१९६६) या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट अॅक्टर नामांकन मिळाले आणि तेव्हा पासून ते बॉलिवूडमध्ये स्थिरावले.
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🌹



