देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 14 सप्टेंबर : फुले, शाहू, चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक भिंगारशहराचे जेष्ठ नेते एकनाथ उर्फ नाथा भिंगारदिवे (वय 65) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई तसेच भाऊ, पुतणे तसेच नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा पंचशीलनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून अंत्यविधी आज दुपारी 12 वाजता भिंगार येथील स्म्शान भूमि येथे होणार आहे.
त्यांना समस्त आंबेडकरी चळवळ व देश स्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा