अरे बापरे! चार लाखांचा रस्ता केला हडप!

अहमदनगर (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यातील खारेकर्जुने गावातील चार लाखांचा रस्ता कागदोपत्री आहे.पण प्रत्यक्षात रस्ताच झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.यामुळे गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारा विषयी नाराजीची चर्चा सुरू केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
खारे कर्जुने गावातील ग्रामपंचायत सरपंच. उपसरपंच. ग्रामसेवक. व सदस्य व जिल्हापरिषद ठेकेदार इंजिनिअर यांनी संगत मत करून मारुती मंदिर ते आदिवासी शबरी आवास योजना मुरमीकरन पोहच रस्ता कागदोपत्री पुर्ण करून प्रत्यक्षात रस्ता न करता सुमारे चार लाख रुपये जिल्हापरिषद कडून काढून घेऊन आपसाआपसात वाटप करून घेतले 26 /1/2022 च्या ऑनलाईन ग्रांमसभा जेव्हा सुरू झाली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजू बोरूडे व लाहनू बोरूडे यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना चार लाख रूपये खर्च करून मुरमीकरन रस्ता आदिवासी शबरी आवास योजनें पर्यत पोहच रस्ता कुठे केला आहे? असा प्रश्न विचारला असता ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच यांनी ऑनलाईन सभा कोरम पुर्ण नाही. असे सांगुन ऑनलाईन ग्रामसभा रद्द केली.
विचारलेल्या प्रश्नावर कुठलेच उत्तर न देता ऑनलाईन ग्रामसभा बंद केली. 27 /1 /2022 रोजी प्रत्यक्ष ग्रामसेवक यांना भेटून विचारना केली असता रस्ता पुर्ण केला आहे. व त्यांचे सर्व बिल पास करून दिले आहे. असे ग्रामसेवक यांनी तोंडी सांगितले. यावेळी बोरूडे यांनी फेसबुक वरून लाईव्ह केले संपूर्ण रस्ता दाखवून देत. मारूती मंदिर ते शबरी आवास योजनें पर्यत पोहच रस्ता झालाच नाही असे दाखवून दिले. रस्ता न करता मंजुर निधी काढून घेऊन आपसाआपसात वाटप करून घेतला आहे असे निदर्शनास आणून दिले. तेव्हा लगेच लाहनू बोरूडे यांनी जिल्हापरिषद कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दक्षिण यांना समंधीत रस्त्याची चौकशी करण्यात यावी व ठेकेदार , ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे पत्र देण्यात आले.
या भ्रष्टाचार प्रकरणी कायदेशीर कारवाई न झाल्यास आदिवासी संघटना व शबरी आवास योजनेचे कैलास लांडे, संजू बोरूडे खरदे विक्री महासंघाचे आबादास शेळके सामाजिक कार्यकर्ते अमोल निमसे रशीद सय्यद अजित निमसे यांनी जिल्हापरिषद येथे केले जाईल. व सर्व जबाबदारी जिल्हापरिषद बांधकाम विभाग दक्षिण यांची राहील असा इशारा देण्यात आला आहे.