गुन्हेगारी

गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीकडुन 01 गावठी कट्टे व 03 जिवंत काडतुस हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 27 जानेवारी: मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 26/01/2026 रोजी नमुद पथक हे मिरजगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिरजगांव, ता. कर्जत शिवारामध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले ब्रिज खाली एक इसम विनापरवाना गावठी कट्टा त्याचे कब्जात बाळगुन थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने मिरजगांव पोलीस स्टेशनचे सपोनि/विजय झंजाड, पोलीस अंमलदार सुनिल खैरे, समीर सय्यद, अशोक रक्ताटे यांना मदतीकरीता बोलावुन घेवुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता बातमीतील ठिकाणी ब्रिज खाली एक संशयीत इसम दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव संग्राम सुनिल जगताप वय – 23 वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 35,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), 2) 3000/- रुपये किमतीचे 03 जिवंत काडतुस असा एकुण 38,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/800 भाऊसाहेब राजु काळे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन मिरजगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 30/2026 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मिरजगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मिरजगांव पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे