अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचे निधन
२०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता
नगर (प्रतिनिधी) अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ ( यां ७५) यांचे ह्रदयविकारानेे निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांचे निधन झाले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २०२१ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले हते. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवल्या. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते.