ब्रेकिंग

मध्यप्रदेशातुन गांजा व्रिकीसाठी आणणारे 2 आरोपी जेरबंद! आरोपीकडून 29,64,200/- रू किं.मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर 🙁 प्रतिनिधी )मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिलेले आहेत.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे व शिवाजी ढाकणे अशांचे पथक नेमूण जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.दि.05/03/2025 रोजी पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असताना पोसई/तुषार धाकराव यांना बातमीदारामार्फत इसम नामे बाबासाहेब धनाजी बडे, रा.हातगाव शिवार, ता.शेवगाव व अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठया प्रमाणात दोन कारमधुन विक्रीसाठी आणुन तो त्यांचे घराशेजारील जनावराचे गोठयामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेली माहिती पोनि/समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांना दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोनि/समाधान नागरे, सपोनि/अशोक काटे, पोसई/महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन मुंढे, आदिनाथ शिरसाठ, मारोती पाखरे, किशोर काळे, पाथरकर, संभाजी धायतडक व पांडुरंग मनाळ अशांचे संयुक्त पथक तयार केले.पथक पंच व आवश्यक साधनासह बातमीतील बोधेगाव ते हातगाव जाणारे रोडवर बाबासाहेब धनाजी बडे, रा.हातगाव, ता.शेवगाव याचे घरी जाऊन जनावराचे गोठयात जाऊन खात्री केली असता गोठयातील खोलीमध्ये दोन इसम मिळून आले.त्यांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अनिल बाबासाहेब बडे, वय 34, रा.हातगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर 2) बाबासाहेब धनाजी बडे, वय 70, रा.हातगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष आरोपी, गोठयामधील खोली व घरासमोरील दोन कारची झडती घेतली घेऊन घटनाठिकाणावरून एकुण 29,64,200/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 66.710 किलो वजनाचा अंमली पदार्थ, दोन मोबाईल, एक मारूती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-11-बीडी-5754 व एक मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा क्रमांक एमएच-43-बीवाय-7784 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपी अनिल बाबासाहेब बडे याचेकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्याने जप्त केलेला गांजा हा 3) मोतीराम पुर्ण नाव माहित नाही, रा.मध्यप्रदेश ( फरार ) याचेकडून विक्रीकरीता आणला असून, आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब धनाजी बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगीतली.वर नमूद आरोपी हे जप्त करण्यात आलेला अंमल पदार्थाचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे, नेम.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 172/2025 एनडीपीएस ऍ़क्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे व शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे