कौतुकास्पद

विदेशी सिगारेट विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! आरोपीकडून 5,03,000/- रू किंमतीच्या विदेशी सिगारेट जप्त!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 12 मार्च (प्रतिनिधी )मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

दिनांक 11/03/2025 रोजी पथक अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नरेश जयपालदास कटारिया, रा.अहिल्यानगर हा त्याचे राधास्वामी स्टोअर्स, कापडबाजार, अहिल्यानगर या दुकानामध्ये भारतामध्ये प्रतिबंधीत केलेले विदेशी सिगारेट बंदी असताना विक्री करत आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष राधास्वामी स्टोअर्स, कापडबाजार, अहिल्यानगर येथे दुकानामध्ये जाऊन तेथे असलेल्या इसमास पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरेश जयपालदास कटारिया, वय 42, रा.मिस्कीननगर, तारकपुर, अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष राधास्वामी स्टोअर्सची झडती घेतली असता दुकानामध्ये भारत सरकाने प्रतिबंधीत केलेले विदेशी बनावटीचे सिगारेट त्यात 1,60,000/- रू किं.त्यात ESSE Light कंपनीचे 80 विदेशी सिगारेट बॉक्स, 2,48,000/- रू किं.त्यात ESSE SPECIAL GOLD कंपनीचे 124 विदेशी सिगारेट बॉक्स, 20,000/- रू किं.त्यात ESSE CHANGE POP कंपनीचे 10 सिगारेट बॉक्स व 75,000/- रू किं.त्यात DUNHILL कंपनीचे 25 विदेशी सिगारेट बॉक्स असा एकुण 5,03,000/- रू किंमतीचे विदेशी सिगारेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या नरेश जयपालदास कटारिया, वय 42, रा.मिस्कीननगर, तारकपुर, अहिल्यानगर हा भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या विदेशी सिगारेट वितरण व व्यापाराकरीता बेकायदेशीरपणे कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्याचेविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 241/2025 सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अधिनियम 2003 चे कलम 7 (1), 7 (3), 20 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे