लुटमारीच्या उद्देशाने प्राध्यापकावर केलेल्या चाकु हल्ल्याच्या गुन्हयातील 2 आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी निखील विकास बोरकर, वय 34,रा.पुसद, ता.पुसद, जि.यवतमाळ हे कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आले असताना दि.06/05/2025 रोजी पहाटे 03.45 वा.सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने ते घराबाहेर आले.फिर्यादी हे रेल्वे स्टेशन रोड लोखंडी पुलावरून जात असताना अज्ञात तीन आरोपी मोपेडवरून येऊन त्यांनी फिर्यादीस आडवून खिसे तपासून पैस न मिळाल्याने फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने प्रतिकार केला.त्यावेळी आरोपीतांनी चाकुने त्यांचे हातावर, पाठीवर वार करून पळून गेले.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 438/2025 बीएनएस कलम 312, 126 (2), 3 (5) प्रमाणे जबरी चोरी प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना जिल्हयातील जबरी चोरीचे ना उघड गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहीद शेख, विजय ठोंबरे, रोहित येमुल, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड अशांचे पथक नेमूण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
दिनांक 09/05/2025 रोजी पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा प्रविण राजु चांदणे, रा.सिध्दार्थनगर, अहिल्यानगर याने त्याचे दोन साथीदारासह केला असून ते सध्या सिध्दार्थनगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकातील पोलीस अंमलदारांनी सिध्दार्थनगर येथे जाऊन संशयीतांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवर असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक आरोपी पळून गेला.पथकाने मिळून आलेल्या 1) प्रविण राजु चांदणे, वय 19 2) राहुल राजू भोसले, वय 20, दोन्ही रा.सारडा कॉलेजमागे, सिध्दार्थनगर, अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदाराचे नाव विचारले असता त्यांनी 3) गणेश विजय लोमटे, रा.प्रेमदान हाडको, अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्हयात वापरलेली 90,000/- रूपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची विना क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आलेली आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रविण राजु चांदणे याने त्याचे वरील दोन साथीदारासोबत मोपेड गाडीवर जाऊन दि.06/05/2025 रोजी पहाटे एका इसमास आडवून गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयांचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.