दिनविशेष

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘शाहिरी शिवगर्जना’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क ​अहिल्यानगर, दि. १७ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य, कर्तृत्व, पराक्रम व शौर्याचा जागर करणाऱ्या ‘शाहिरी शिवगर्जना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील माऊली सभागृह, सावेडी येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
​छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेतून जनतेला स्वाभिमान, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना शिवचरित्राची ओळख व्हावी व नव्या पिढीमध्ये शिवप्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
​प्रसिद्ध शाहीर सुमित धुमाळ आणि १० कलावंतांचा संच ‘शाहिरी शिवगर्जना’ या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध नाट्य, नृत्य आणि शिवगीते सादर करणार आहे.
​अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीचा उत्सव भव्य, प्रेरणादायी व ऐतिहासिक वातावरणात साजरा होणार असून, शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे