नगर ः आधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून साईदीप हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली. कोरोना काळात प्रयत्नांची पराकाष्टा करून अनेकांचे जीव वाचवले. वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत असून, आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रुग्णांचे व्याधी लवकरात लवकर बरे करण्यासाठी होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
तारकपूर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये अद्यावत तंत्रज्ञानयुक्त उभारण्यात आलेल्या रेडिओलॉजी विभाग व 1.5 टेस्ला एमआरआय मशीनचा लोकार्पण जिल्हाधिकारी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. एस. एस. दीपक, साईदीप इमेजिंगचे डॉ. धनंजय वाघ, डॉ. सुहास घुले, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. साहिल कुलकर्णी, डॉ. माधवी कुलकर्णी, डॉ. सुमा वाघ, डॉ. स्वाती घुले, कार्डियोलोजिस्ट डॉ. किरण दीपक, न्यूरो फिजिशियन डॉ. राहुल धूत, डॉ. आर.आर. धूत, डॉ. रविंद्र सोमाणी, डॉ. निसार शेख, डॉ. कैलाश झालानी, डॉ. श्यामसुंदर केकडे, डॉ. हरमीत कथूरिया, डॉ. अनिल कुर्हाडे, डॉ. इकबाल शेख, डॉ. वैशाली किरण, डॉ. संगीता धूत, डॉ. पायल धूत, डॉ. अश्विन झालानी, डॉ. भूषण खर्चे, डॉ. विश्वजीत पवार, डॉ. रोहित धूत, डॉ. गणेश सारडा, डॉ. साहिल शेख आदी उपस्थित होते.
डॉ. एस. एस. दीपक यांनी नवीन युवा डॉक्टर व प्रदीर्घ सेवेत असलेल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन साईदीप हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली व सर्वसामान्य नागरिकांना अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.