नगर दि. 17 जून (प्रतिनिधी )- विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मधे पालक दिना निमित्त सर्व पालकांचा सन्मान बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते व शाळेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते शाळेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी प . पू.माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्याचे हसस्ते करण्यात आले या वेळी संस्थे चे सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, खजिनदार संदीप गांगर्डे व अथर्व बोज्जा उपस्थीत होते.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले आज पर्यंत मदर्स डे अनेक ठिकाणी साजरे केलेले अनुभवले परंतु पहिल्यांदाच फादर डे साजरा होत असल्याचे मी पहात असून ही बाब कौतुकासपदच आहे. वडील हयात असताना आपण त्यांच्या कडे लक्ष देत नाही व ते गेल्या नंतर आपण रडत बसतो त्या पेक्षा ते हयात असतानाच त्यांची काळजी घ्या ते म्हणतील तसे वागा नक्कीच त्यांना आनंद होईल. पालकांनी सुध्दा आपल्या पाल्यावर आपले निर्णय लादू नका, त्यांचे सुप्त कलागुणांना वाव दया असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळे बाबत माहिती दिली व पालकांना शुभेच्छा दिल्या, या वेळी डॉ. पारगावकर, संदीप गांगर्डे, अथर्व बोज्जा व पालकांच्यावतीने गौतम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेतील मुलांनी फादर्स डे निमित्त भाषणे केलीत तर काही मुलांनी वडिलांच्या आधारावर असलेल्या हिंदी गाण्यावर सामूहिक डान्स केला.
शाळेचे मुख्याध्यापिका उषा गरड यांनी सूत्रसंचालन केले, उपमुख्याध्यापिका संगीता गांगर्डे यांनी पाहुण्याचे स्वागत केलं तर पर्यवेक्षक सौ दिपाली हजारे यांनी आभार मानले. या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ रूपाली जोशी, सौ पूजा चव्हाण, सौ आरती हिवारकर, सौ अर्चना चव्हाण, वैष्णवी नजन, निकिता पाळंदे, सीमा हिवाळे व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा