देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 31 ऑक्टोबर:
उद्या शनिवार, दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शंकरराव शिंदे उपस्थित राहणार असून,
जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्या शुभहस्ते कॅथलॅब युनिटचे लोकार्पण होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आनंदराव आबिटकर भूषवणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा