देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 12 नोव्हेंबर : नगर तालुक्यातील कर्जुनेखारे येथे एका 6 वर्षाच्या चिमुरडीला बिबटयाने उचलून नेले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
या बातमीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील कर्जुनेखारे येथील गट नंबर 220 मध्ये दि. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7. 20 ते 7. 30 च्या दरम्यान रियंका सुनील पवार या मुलीला बिबटयाने उचलून नेले आहे.या घटनेमुळे गावकरी व परिसरातील नागरिक भयभीत झाले असून ग्रामपंचायत,वनविभाग व जिल्हा प्रशासनाने तातडीने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा