लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे*
महापुरुषांच्या यादीतून अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळल्याचा आरपीआय कडून निषेध*
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे*
*महापुरुषांच्या यादीतून अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळल्याचा आरपीआय कडून निषेध*
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव महापुरुषांच्या यादीतून वगळल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून तात्काळ भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या मागणीस विविध आंबेडकरवादी संघटनांनी पाठिंबा दिला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय घोष करीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, मातंग आघाडीचे अर्जुन शिंदे, गणेश अडागळे, रामवाडी नागरी कृती समितीचे प्रकाश वाघमारे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, लहुसंग्राम प्रतिष्ठानचे सागर साळवे, यशराज शिंदे, कृपाल भिंगारदिवे, अतुल शेंडगे, अजित गाडे, विशाल गाडे, तेजस शेंडगे, प्रसाद इंगळे, प्रेम शेंडगे, संकेत शेंडगे, रोहण शेंडगे, अजय साबळे, विशाल भोसले, सचिन बोरगे, सौरभ पवळ, विजय साबळे, वरुन वाघमारे, प्रथमेश शेंडगे, ऋतुराज शेंडगे, बंटी गाडे आदी युवक उपस्थित होते.
भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या संस्थेमार्फत राज्यातील महापुरुष, प्रबोधनकार व प्रतिष्ठित व्यक्तीची नांवे यादीत समाविष्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत घेणे गरजेचे असताना फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला आहे. ते प्रतिष्ठित नव्हते असे, नमूद करुन त्रिवेदी यांनी अकलेचे तारे तोडण्याचे काम केले असल्याचे निवेदनात नमुद करुन या प्रकरणाचा निषेध आरपीआयच्या वतीने नोंदविण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून तेरा लोकनाट्य, चौदा कथा, सहा नाटके, सदोतीस कादंबर्या, पंधरा पोवाडे, आठ गीत लेखन, सात चित्रपट कथा अशा असंख्य साहित्य संपत्तीची निर्मिती केली. या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षित घटकांच्या व्यथा मांडल्या. जगाच्या सत्तावीस भाषेत त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सात समुद्रापार पोहोचवला. असे असताना देखील सत्यशोधक, बहुजन समाजाचे जननायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव महापुरुषांच्या यादीत समावेश करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.