देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर -दि. 12 नोव्हेंबर: पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज, अहिल्यानगर च्या वतीने पद्मशाली समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्राचे उदघाटन आ. संग्राम भैय्या जगताप व मा. नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंचकमिटी चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, देवस्थान चे अध्यक्ष गणेश विद्ये, जेष्ठ सदस्य कुमार आडेप, शरद मडूर, गिरीष चिट्टा, धनंजय येनगुपटला, ज्ञानेश्वर मंगलारम, महेंद्र बिज्जा सह समाजातील नागरिक व पंचकमिटी चे पदाधिकारी व विश्वस्त मंडळ मोठया प्रमाणात उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते श्री मार्कंडेय महामुनी चे पूजन करून समुपदेशन केंद्राचे बोर्डाचे अनावरण करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी बोलतांना आ. जगताप म्हणाले पद्मशाली समाज अहिल्यानगर मध्ये मोठया प्रमाणात आहे व प्रामाणिक समाज म्हणून ओळख आहे. समाजाने समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरु करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे व आज काळाची गरज आहे. वैद्यकीय खर्च जसे पेलवत नाही तसे कोर्टाचा खर्च ही न पेलवणारा झाला आहे या साठी समाजातील वकिलांनी जो निर्णय घेतला तो अभिमानास्पद असून इतर समाजानेही अश्या प्रकारे मोफत समुपदेशन केंद्र सुरु करावे असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
यावेळी बोलतांना धनंजय जाधव म्हणाले पद्मशाली समाज नेहमीच जाधव कुटुंबाचे मागे उभे राहिला आहे हा मोठा इतिहास आहे समाजासाठी मी जो हॉल उपलब्ध करून दिला तो एक खरीच्या वाट्या प्रमाणे मदत आहे, मी समाजाचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, या पुढेही समाज माझ्या मागे पूर्वी प्रमाणेच उभे राहावे असे आवाहन केले.
यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरु करण्याचा निर्णय आम्ही सर्व विश्वस्तानी एकत्र येऊन घेतला असून याचा फायदा समाजातील सर्वच घटकांसाठी होणार असून या पुढेही आम्ही विश्वस्त मंडळ समाजाच्या विकासासाठी व प्रत्येक घटकांसाठी समजउपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न राहील.
समुपदेशन केंद्राचे त्रिसदस्य कमिटी ऍड सिरसूल, ऍड बोडखे मॅडम व ऍड मच्चा तसेच इतर सदस्य ऍड राजू गाली,ऍड येनगंदुल, ऍड जेटला, कमिटी चे मार्गदर्शक ऍड पांडुरंग बल्लाळ आदी वकील मंडळींनी आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत हे केंद्र सुरु असेल याचा लाभ समाजाने घ्यावे असे आवाहन केंद्राचे वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सिरसूल यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत विनोद बोगा यांनी केले तर आभार रवी दंडी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त मंडळ तिरमलेश पासकंटी, अंबादास गोटीपामूल,पुरषोत्तम सब्बन, प्रणित अनमल, सागर सब्बन, राजेंद्र बोगा, पुरषोत्तम बुरा, विलास दिकोंडा, श्रीनिवास वंगारी, अमित बिल्ला, अमोल गाजेंगी, दत्तात्रय जोग, अभिजित चिप्पा, विनोद म्याना, शंकर जिंदम, चेतन अरकल, हरिभाऊ येलदंडी शंकरराव बत्तीन, राजेंद्र बिज्जा आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा