देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 6 नोव्हेंबर: सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात पावसाचा कहर झाला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके उधवस्त झाली, अनेक जणांचे संसार उध्वस्त होत, आलेल्या पुरामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथून जवळच असणाऱ्या शिरापूर येथील रावसाहेब शेलार व मंगल शेलार या भूमिहीन दलित कुटुंबातील कर्ता मुलगा अतुल रावसाहेब शेलार हा दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी पुरामध्ये वाहून गेला. तीन दिवसांच्या शोध मोहिमे नंतर हा अतुल याचा मृतदेह 23 सप्टेंबर 2025 ला तिसगाव शिवारातील भडके वस्ती जवळ सापडला.
पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर हिंदू पद्धतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याला एक छोटा भाऊ अक्षय असून अक्षय याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास गजभिव व रावसाहेब शेलार कुटूंबीयांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा उप जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना निवेदन सादर केले आहे.
रावसाहेब शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे की, ते दलित समाजाचे असून भूमिहीन आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला असून, मृत अतुल हा कुटुंबाचा एकमेव कर्ता सदस्य होता. आता त्यांच्या कुटुंबात केवळ तीन व्यक्ती उरल्या आहेत.
त्यामुळे, कुटुंबाची गंभीर आर्थिक स्थिती आणि मृत व्यक्ती कुटुंबाचा आधारस्तंभ असल्यामुळे, त्यांचा दुसरा मुलगा अक्षय रावसाहेब शेलार याला शासकीय सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
▶️माझ्या घरातील कर्ता मुलगा अतुल गेल्याने आमचा आधार गेला आहे. आम्ही भूमिहीन असून पूरग्रस्तांचा निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, खासदार निधी, आमदार निधी, जिल्हा समाज कल्याणनिधी इत्यादी बाबीतून आर्थिक सहाय्यता मिळावी. माझा दुसरा मुलगा पदवीधर असून शिरापूर ग्रामपंचायत येथे वसुली अधिकारी ही जागा रिक्त असून त्याला सामावून घ्यावे. जेणेकरून म्हातार पणात आम्हाला त्या आधारे तरी राहिलेले जीवन जगता येईल.
▶️ रावसाहेब शेलार, मंगल रावसाहेब शेलार
(मृत मुलगा अतुल शेलार याचे आई, वडील)
सदर निवेदनावर रावसाहेब शेलार,(वडील) जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, जिल्हा संघटक संजय ताकवले,पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास गजभिव, पाथर्डी तालुका उपाध्यक्ष रामदास माळी, तालुका संघटक मिलिंद सोनवणे, आदींच्या
सह्या आहेत. यावेळी अतुल भिंगारदिवे, कैलास पगारे, मेहेर कांबळे, पोपट रोकडे, चंद्रकांत नरवडे, सनी माघाडे, अमोल जाधव, वैशाली शिरसाठ, कविता कवडे, सुनिता शिंदे, नेहा जावळे, रूपाली आयंची यांसह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा