सामाजिक

प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी मला महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे,प्रभाग 13 मधील छोटया, मोठया समस्या सोडविण्यासाठी 24 तास उपलब्ध : नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 5 मार्च : प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे हे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात त्याचा प्रत्यय प्रभागातील नागरिकांना सातत्याने येत असतो.

प्रभाग क्र १३ मधील मद्रासचाळ व केदारे वस्तीमधील नागरिकांच्या वाहतुकीस व विज तारांना अडचण ठरणारे बाभूळच्या व पिंपळाच्या झाडांच्या फांदया छाटण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री सुरेश भाऊ बनसोडे यांनी स्वतः उपस्थित राहून करून घेतले.यावेळी स्थानिक नागरिक आवर्जून उपस्थित होते, यावेळी बोलतांना ते म्हणाले यापुढेही प्रभागातील प्रत्येक छोट्या मोठ्या समस्या साठी आम्ही २४ तास उपलब्ध असून नगरसेवक या शब्दाचा अर्थ प्रभागातील नागरिकांचा सेवक प्रभागातील नागरिकांनी प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी मला मोठया विश्वासाने महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले असल्याचे नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे म्हणाले.
यावेळी मद्रास चाळ, केदारे वस्ती,प्रभागातील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे