सामाजिक

भिमसैनिक किरण भोसले आत्महत्या प्रकरणी, आखिल भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे यांनी घेतली मंत्री रामदास आठवले यांची भेट आरोपीस तात्काळ अटक करण्याची केली मागणी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 3 ऑक्टोबर : भिम सैनिक किरण भोसले आत्महत्या प्रकरणी, आखिल भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे यांनी घेतली मंत्री रामदास आठवले यांची भेट घेत आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, दि. 26 सप्टेंबर रोजी रात्री बोल्हेगाव येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी सचिन दाताळ याचे विरुद्ध आत्महत्तेस प्रवृत करणे, व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी मयत किरण भोसले याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी अखिल भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे यांनी मयत भोसले यांच्या कुटुंबिया समवेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची येथील शासकीय विश्राम गृह येथे भेट घेतली. यावेळी मयत किरण भोसले याची पत्नी, नातेवाईक उपस्थित होते. यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, प्रा. विलास साठे,प्रवीण भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳
या प्रकरणी मंत्री आठवले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना फोन करत सर्व माहिती घेतली.अखिल भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे आरपीआय आठवले गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा विश्राम गृहावर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे