अभिवादन

आई-वडिलांच्या संपत्तीचे वारस होण्यापेक्षा त्यांच्या कर्मांचे वारस होता आले पाहिजे: बौद्धाचार्य दिपक पाटोळे

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 6 नोव्हेंबर जिवंतपणी आई-वडिलांच्या सेवेमध्ये खरे पुण्य सामावलेलं आहे. आपण सर्वजण एकमेकांना सोडून जाणारे आहोत. त्यामुळे आपल्या हातून जिवंतपणी कुशल कर्म झाले पाहिजे.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धाचार्य दिपक पाटोळे यांनी केले. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सिद्धार्थनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्मृतीशेष मंदा रमेश भोसले यांच्या जलदान विधी प्रसंगी ते बोलत होते, यावेळी ते पुढे म्हणाले आजकाल तरुण पिढीचा संवाद कमी होत चालला असून तो वाढला पाहिजे, जिवंतपणीच आई, वडील यांची विचारपूस केली पाहिजे त्यांच्या मृत्यूनंतर आपण जलदान विधीला काय जेवण घालतो हे पाहायला ते नसतात, जगामध्ये मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेली मावशी, अशी अनेक मानलेल्या नात्यांची उदाहरणे देता येथील, परंतु मानलेली आई व मानलेले वडील असे कधीच आपल्याला एकावयास मिळत नाही. कारण हेच नाते असे आहे कि ते एकच असते त्याला पर्याय नाही अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक माधवराव चाबुकस्वार, शहर उपाध्यक्ष मोहन शिरसाठ, पत्रकार महेश भोसले, शहर संघटक राजेंद्र थोरात, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी साळवे, सामाजिक कार्यकर्ते किशोर साळवे,प्रभाकर साळवे,विजय शिरसाठ, शरद जाधव, राजूभाऊ दाभाडे,नायब तहसीलदार अरविंद साळवे, शिरीष रोकडे, सुरेश भोसले, सुनील भोसले, राजू मिसाळ, दिपक भोगवाल, गौरव आल्हाट, तसेच नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी स्मृतीशेष मंदा रमेश भोसले यांना सामूहिक शद्धाजंली वाहण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे