अभिवादन
माजी आरोग्य समिती सभापती, माजी नगरसेवक कालकथित अजयराव साळवे यांच्या शोकसभेस केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले उपस्थित राहणार


या पार्श्वभूमीवर त्यांचा जलदान विधी व सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन दि. 2 ऑक्टोबर रोजी सिद्धीबाग येथील भगवान गौतम बुद्ध पुतळ्या जवळ सकाळी 10 वाजता होणार असून या शोकसभेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले उपस्थित राहणार आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते व आंबेडकरी चळवळीतील सर्व गटातील नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,जेष्ठ मार्गदर्शक प्रा. भिमराव पगारे, विजयराव भांबळ, प्रा. विलास साठे,आरपीआयचे युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे यांनी दिली आहे.