गुन्हेगारी
भिमसैनिक किरण भोसले आत्महत्या प्रकरणी, आत्महत्येस प्रवृत करणे, ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

-
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 सप्टेंबर : भिम सैनिक किरण भोसले आत्महत्या प्रकरणी, आत्म हत्येस प्रवृत करणे, ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची विस्तृत माहिती अशी की, मयत किरण तान्हाजी भोसले (वय. 33 रा. बोल्हेगाव ) याचा बोल्हेगाव येथे सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या दुकानातून सचिन जगन्नाथ दाताळ,याने 1900 सिमेंट गोण्या 6 लाख 49 हजार रुपये किमतीच्या उधारीवर घेतल्या, त्यानंतर वेळोवेळी सचिन दाताळ, याला उधारीचे पैसे देण्यासाठी मयत किरण भोसले फोन करत असत, परंतु त्याने पैसे दिले नाहीत, याप्रकरणी काल शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी रात्री बोल्हेगाव येथील राहत्या घरी गळाफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याबाबत मयत किरण भोसले यांनी दिलेल्या फिर्यादिवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत करणे, ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणा बाबत पत्रकार महेश भोसले,कॉम्रेड अंनत लोखंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, आरपीआय आठवले गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, आरपीआयचे जेष्ठ नेते विजयराव भांबळ, आरपीआयचे जेष्ठ नेते सदाशिव भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे,किरण गायकवाड,प्रवीण भिंगारदिवे, राहुल साळवे, त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



