देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 26 सप्टेंबर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचे कट्टर समर्थक
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव माजी नगरसेवक, माजी आरोग्य समिती सभापती अजयराव सुधाकर साळवे (वय : 59)यांचे निधन दि. 26 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजता आनंदऋषी हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्यात पत्नी, तीन मुले, भाऊ, बहिणी, मेहुणे, नातेवाईक व अहिल्यानगर जिल्ह्यातील मित्र परिवार व कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे नातेवाईक, मित्र परिवार व कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी आज दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
माजी नगरसेवक, माजी आरोग्य समिती सभापती अजयराव साळवे यांना, निलक्रांती चौक मित्र मंडळ, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी चळवळ व देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क व डिजिटल मीडियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा