देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 15 नोव्हेंबर :पो.नि.श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, दिपक जाधव अशांना अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले इसम चेक करुन ते मिळुन आल्यास त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
दिनांक 13/11/2026 रोजी पथक अहिल्यानगर शहरामध्ये हद्दपार करण्यात आलेले आरोपी चेक करत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, हद्दपार करण्यात आलेला इसम सरवर अस्लम शेख उर्फ भिम्या, रा.झेंडीगेट अहिल्यानगर हा झेंडीगेट येथील पाण्याचे टाकीजवळ थांबलेला आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने झेंडीगेट, अहिल्यानगर परिसरात हद्दपार केलेल्या इसमाचा शोध घेऊन 1) सरवर अस्लम शेख उर्फ भिम्या, वय 35, रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.त्याचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्यास दिनांक 01/08/2026 रोजी पासुन अहिल्यानगर शहराच्या हद्दीतून 01 वर्षाकरीता हद्दपार केलेले असताना देखील तो आदेशाचा भंग करून अहिल्यानगर शहरात मिळून आला.
ताब्यातील आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन 1078 /2026 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा