गुन्हेगारी

श्रीरामपूर व श्रीगोंदा येथील अवैध धंदयावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 3 गुन्हयांत 1,24,960/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 1 नोव्हेंबर : मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सपोनि/हरिष भोये व पोलीस अंमलदार अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे, किशोर शिरसाठ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, गणेश धोत्रे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, दिपक जाधव, मनोज साखरे, रोहित मिसाळ, रोहित येमुल व प्रताप देवकाते अशांचे दोन पथक तयार करून जिल्हयातील अवैध धंदयावर करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून रवाना केले.
दिनांक 30/10/2026 रोजी पथकाने श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर शहर व श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व जुगार या छापे टाकुन 3 गुन्हयांत 1,24,960/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अ.क्र. पोलीस गुरनं व कलम जप्त मुद्देमाल किंमत आरोपीचे नाव
1 श्रीरामपूर तालुका 448/2026 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) मुद्देमाल किंमत 8,080/- 1) संजय बाबासाहेब खताळ, वय 42, रा.माळवडगाव, ता.श्रीरामपूर
2 श्रीरामपूर शहर 1069/2026 महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) मुद्देमाल किंमत 80,600/- 1) अजिज मिरन शेख, वय 26,
2.अभिजीत उत्तम गिरी, वय 36
3.रविंद्र बाळासाहेब चव्हाण (फरार) सर्व रा.वॉर्ड नं.4, श्रीरामपूर
3 श्रीगोंदा 444/2026 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) मुद्देमाल किंमत 36,280/- 1) कृष्णा बाळासाहेब मुंढेकर, वय 39, रा.मुंढेकरवाडी, ता.श्रीगोंदा
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे