देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 19 ऑक्टोबर :मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/विकास जाधव व पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, पंकज व्यवहारे, अमोल आजबे, अतुल लोटके, विष्णु भागवत, अशोक लिपणे, रोहित येमुल अशांचे पथक तयार करून अवैध धंदयाची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 19/10/2026 रोजी पथक पारनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती काढत असताना टाकळी ढोकेश्वर ते पारनेर जाणाऱ्या रोडवर ढंपरमधुन चोरून वाळुची वाहतुक चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून तीन ढंपर थांबवून पंचासमक्ष ढंपरमध्ये वाळु मिळून आल्याने 1) अक्षय बाबा जेडगुळे, वय 29, रा.वासुंदे, ता.पारनेर 2) गोरख सखाराम मधे, वय 24, रा.शिखरी वासुंदे, ता.पारनेर 3) प्रशांत भिकाजी वाळुंज, रा.काकणेवाडी, ता.पारनेर (फरार) 4) ऋतीक भाऊसाहेब टोपले, वय 24, रा.वासुंदे, ता.पारनेर व 5) चैतन्य डुमरे पुर्ण नाव माहित नाही रा.ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे (फरार) अशा ढंपरचालक व मालक यांचेविरूध्द गुन्हा दाखल केला.तसेच ताब्यातील आरोपीचे कब्जातून 60,90,000/- रू किं.त्यात 3 ढंपर व वाळु असा* मुद्देमाल जप्त केला.वर नमूद आरोपीविरूध्द पारनेर पोलीस स्टेशन गुरनं 828/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3(5) सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पथकास अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, खडकवाडी गावचे शिवारात बोरवाक नदीचे ओढयाच्या कडेला ता.पारनेर येथे जेसीबी, ट्रॅक्टर व ढंपरच्या सहाय्याने चोरून वाळुची वाहतुक चालू आहे.पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे वाळु उपसा चालू असल्याने छापा टाकून दोन जेसीबी व ट्रॅक्टर थांबविले.घटना ठिकाणाहुन 56,05,000/- रू किं.त्यात दोन जेसीबी, सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह व वाळू असा मुद्देमाल जप्त केला.वाहन चालक व मालक 1) योगेश बाळु उघडे, वय 28, रा.वनकुटे, ता.पारनेर 2) ओंकार बोरूडे पुर्ण नाव माहित नाही रा.टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर (फरार) 3) ओंकार रावासाहेब गोर्डे, वय 22, रा.टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर 4) सुधीर शिंगोटे पुर्ण नाव माहित नाही रा.खडकवाडी, ता.पारनेर (फरार) 5) अमोल आल्हाट पुर्ण नाव माहित नाही रा.टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर (फरार) व 6) रोहित साळवे पुर्ण नाव माहित नाही रा.टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर (फरार) यांचेविरूध्द पारनेर पोलीस स्टेशन गुरनं 829/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3(5) सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पथकाने दिनांक 19/10/2026 रोजी पारनेर पोलीस स्टेशनला वर दाखल केलेल्या दोन्ही गुन्हयांत *1,16,95,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले असून गुन्हयाचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा