देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि 19 ऑक्टोबर : बहुजन शिक्षण संचलित
दादासाहेब रूपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी सर यांना अस्पायर फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याबाबत बहुजन शिक्षण संघांचे कार्यकारी विश्वस्त ऍड. संघराज रुपवते, उत्कर्षाताई रुपवते, माजी कार्यकारी रजिस्ट्रार प्रा. व्ही. एम. बैचे,कार्यकारी रजिस्ट्रार प्रा. राजेंद्र एडके सर, पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भिमराव पगारे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,पत्रकार महेश भोसले, सुनील क्षेत्रे,प्रा. संजीवन साळवे, अजय भिंगारदिवे (कलाशिक्षक ), प्रा. संदीप पाखरे, प्रा. महेंद्र कदम, पटेकर मॅडम, राजू ससाणे यांनी दादासाहेब रुपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा