प्रासंगिक

अहिल्यानगरची नवदुर्गा.. कु.श्रध्दा अष्टेकर

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 18 ऑक्टोबर : अगदी सकाळीच जुने जिल्हा न्यायालय समोर वकील मित्रमंडळी सोबत चाय पे चर्चा करत असतानाच सायकल वरून वर्तमानपत्र टाकणा-या एका मुलीकडे सहजच लक्ष गेले. न राहुन मी तिच्याबरोबर बोलायला लागलो.
आजकाल महिला सबली करणावर भरभरून चर्चा होत आहे. काही महिला किंवा मुली काम असुनही करीत नाहीत किंवा काहीना कामकाज मिळत नाही. पुरूष प्रधान संस्कृतीत काही पुरूष मंडळी कधी कधी महिलांना जाणुन बुजुन दुर्लक्षित करतात तर काहि महिला पुरूष मंडळीना विनाकारण त्रास देतात.
केवळ काम नाही म्हणून घरातील लोकांवर अवलंबून असणा-या अनेक मुली आहेत. आज महिला देशातील सर्वोच्च पदावर कार्यरत आहे. असे  कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलां भगिनीनीं आपल्या कार्याचा ठसा उमटवला नाही. मग नगरची नवदुर्गा श्रध्दा याला कशी अपवाद असणार.  श्रध्दा बरोबर पाच मिनिटाच्या गप्पांमधून खरोखरच वाटले की, कोणत्याही परिस्थितीवर  बेधडक पणे मात करण्याची जिद्द या मुलीकडे आली कुठून.  श्रध्दाचे वडील संतोष दत्तात्रय अष्टेकर आणि आई सौ वैशाली हे अतिशय गरीब असलेले कुटुंब. श्रध्दाला भक्ती आणि आराध्या या दोन बहिणी आहेत. श्रध्दाला भाऊ नाही. परंतु श्रध्दाने भावाची उणीव आईवडीलानां भासु दिली नाही. लहानपणापासूनच आजीच्या खानावळीत छोटीशी कामं करून  मदत करणारी श्रध्दा कधीच डगमगून गेली नाही. आई वडील कामासाठी बाहेर गेल्यावर श्रध्दा घरातील कामकाज करुन आपल्या बहिणींची काळजी घेत होती. आईवडीलांना हातभार लावत होती. तिला थोडं बोलतं केल्यावर श्रद्धा निर्भिड पणे म्हणाली,” काम कोणतेही लहान नाही, आपण चोरी करून पैसे मिळवत नाहीत, त्यामुळेच मी बिनधास्तपणे वयाचे सोळाव्या वर्षापासून वर्तमानपत्र वाटपाचे काम करीत आहे”.
एकंदरीत तिच्याबरोबर बोलताना तिचा निर्भिड पणा जाणावला.
आजोबां बरोबर आणि वडिल यांचे बरोबर पेपर स्टाॅलवर पेपर विक्री करुन श्रध्दा शिक्षण घेत होती. आज ती  एमएस्सी मायक्रो बायोलाॅजी चे शिक्षण घेत आहे. उन वारा पाऊस याची तमा न बाळगता श्रध्दा सायकल वरुन घरोघर जावुन वर्तमानपत्र  टाकायचे काम करते. खरं तर आज सायकलवर वर्तमानपत्र वाटायचे दिवस नाहीत, कारण प्रत्येकालाच टुव्हिलर असते. मला असं वाटतंय की,वर्तमानपत्राचे क्षेत्रात अनेक महिला भगिनी चांगले काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचे कार्य तर कौतुकास्पद आहेच . परंतु अहिल्यानगर मधे वर्तमानपत्र वाटणारी श्रध्दा हि कदाचित एकटीच मुलगी असावी. खरंतर वर्तमानपत्रात कार्य करणारे पत्रकार बांधव, संपादक साहेब आणि नगरवासियानीं या नवदुर्गेच्या कामाची दखल घेतली पाहिजेत. जर शक्य असेल तर तिला काही मदत करता येईल काय याचा विचार अहिल्यानगर च्या लोकप्रतिनिधीं कडून झाला, तर तिचे पुढील शिक्षण सहज शक्य होईल. शिक्षणाचे आड गरीबी कधीच येत नाही हे श्रध्दाने सिध्द करून दाखवले असं म्हणायला हरकत नाही. नवरात्रोत्सवा निमित्त या नवदुर्गेची आणि माझी भेट होईल असे वाटले नव्हत.  श्रद्धा सारख्या नवदुर्गेला मनापासून मनापर्यंत मानवंदना आणि  पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शब्दांकन- ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील
94 22 22 1857

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे