देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 ऑक्टोबर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव माजी आरोग्य समिती सभापती आता माजी नगरसेवक पॅंथर अजय राव साळवे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. या पार्श्वभूमीवर बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त एडवोकेट संघराजजी रुपवते तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी जिना भाभी यांनी नुकतीच साळवे कुटुंबीयांची भेट घेतली. साळवे कुटुंबीयांशी चर्चा करताना एडवोकेट संघराजजी रुपवते म्हणाले माझी व अजय राव साळवे म्हणजेच मेंबर यांची अनेक वेळा सामाजिक विषयावर चर्चा व्हायची पॅंथर अजयराव साळवे म्हणजे एक वेगळीच केमिस्ट्री त्यांचं जाणं अत्यंत क्लेशदायी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आरपीआय आठवले गटाच्या माध्यमातून पक्षाचा रिलीफ फंड मिळावा याबाबत मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहे .
एडवोकेट संघराजजी रूपवते यांनी बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेत. कालकथित अजय राव साळवे यांना पुष्प अर्पण करत भावपूर्ण आदरांजली वाहिली .
यावेळी शांताबाई साळवे (आई ) पत्नी अनुराधाताई साळवे, गोपीनाथ अजयराव साळवे (मुलगा ), राहुल अजयराव साळवे (मुलगा), निखिल अजयराव साळवे मुलगा तसेच बहुजन शिक्षण संघाचे माजी रजिस्ट्रर प्रा. व्ही. एम. बैचे सर, दादासाहेब रुपवते विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी सर, दादासाहेब रूपवते विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड सर, प्रा. भीमराव पगारे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव बोरुडे, पत्रकार महेश भोसले, प्रा. संजीवन साळवे,राजू ससाणे, निलक्रांती चौकातील धडाडीचे कार्यकर्ते अविनाश शिंदे त्याचप्रमाणे दादासाहेब रूपवते विद्यालय येथील कर्मचारी व निलक्रांती चौकातील कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा