देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 नोव्हेंबर :मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लबडे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे व संभाजी कोतकर, अशांचे पथक तयार करून अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 17/11/2026 रोजी तपास पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, जमजम कॉलनी, गल्ली नं.10, संगमनेर येथे काही इसम हे फैजान अक्तार शेख याचे घरालगतच्या निळया रंगाच्या पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करीत आहेत.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केलेली दिसून आली.कत्तल करणारे इसमांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.पथकाने घटनाठिकाणाहुन 4,20,000/- रू किं.त्यात 1400 किलो गोमांस, 700/- रू किं.त्यात तीन चाकु व दोन लोखंडी कु-हाड, 2000/- रू किं.त्या एक इलेक्ट्रीक काटा असा एकुण 4,22,700/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पथकाने छापा टाकुन केलेल्या कारवाईबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुरनं 1093/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 (ब) (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा