देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 15 नोव्हेंबर :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 24/07/2026 रोजी स्वस्तिक पुणे बसस्थानक, अहिल्यानगर येथे फिर्यादी बसमध्ये चढत असतांना अज्ञात आरोपीतांनी पर्समधुन 3,60,000/- रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 720/2026 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/विकास जाधव व पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, विकास साळवे, भगवान सानप, बाळासाहेब खेडकर, संतिष भवर, प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, किरण ठुबे अशांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 14/11/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करताना असतांना माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा शिल्पा प्रशांत चव्हाण रा.निपाणी वडगाव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर हिने तिचे साथीदारासह केला असुन ती सध्या माळीवाडी बसस्टॅन्ड येथे थांबलेली आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरुन माळीवाडा बसस्टॅन्ड येथे शोध घेवुन 1) शिल्पा प्रशांत चव्हाण, वय- 22 वर्षे रा.निपाणी वडगाव ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर हिस ताब्यात घेतले. ताब्यातील महिला आरोपीस विश्वासात घेऊन, गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता तिने सदरचा गुन्हा तिचे साक्षीदार 2) दिपाली उर्फ गुटी निखील चव्हाण रा.शेवगाव रोड, पाथर्डी, (फरार) 3) कारली पाल्या चव्हाण रा.कोरडगाव ता.पाथर्डी (फरार), 4) कोमल नागनाथ काळे रा.पाथर्डी रोड, शेवगाव, ता.शेवगाव(फरार), 5) यासमिन ठाकुर भोसले रा.भानसहिवरा ता.नेवासा(फरार), अशांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील महिला आरोपींकडे त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांचेकडुन अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 कोतवाली जि. अहिल्यानगर 720/2026 बी.एन.एस. 2023 चे क. 303(2)
2 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 1298/2026 बी.एन.एस. 2023 चे क. 303(2)
3 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 1022/2026 बी.एन.एस. 2023 चे क. 303(2)
पथकाने तपासकामी 6,11,000/- रू किमतीचे 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे.
ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले असून, गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा