ब्रेकिंग

भुसार मालाचे दुकान फोडून सोयाबीन चोरणारी आंतरजिल्हा टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद बुलढाणा व जालना जिल्हयातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 2 नोव्हेंबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 31/10/2026 रोजी यातील फिर्यादी श्री.प्रदिप कडुबाळ भनगे, रा.सुरेशनगर, नेवासा  हांडी निमगाव, ता.नेवासा येथील शिनाई ई ट्रेडींग या भुसार मालाच्या दुकानाचे अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून दुकानातील 1,75,000/- रू किंमतीचे सोयाबीन चोरून नेले.याबाबत नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 891/2026 बीएनएस कलम 331 (4), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,फुरकान शेख, प्रशांत राठोड, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, अजिनाथ पाखरे व शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे अशांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

दिनांक 01/11/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करताना खात्रीशीर माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा भानुदास बाबुराव गायकवाड, रा.देऊळगाव राजा, जि.बुलढाणा याने त्याचे साथीदारासह केला आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून बुलढाणा जिल्हयात आरोपीचा शोध घेऊन 1) भानुदास बाबुराव गायकवाड, वय 33, रा.देऊळगाव राजा, ता.देऊळगाव राजा, जि.बुलढाणा यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार 2) विनोद विठठल काळे, रा.लोणगाव, ता.भोकरदण, जि.जालना 3) अंकुश तेजराव खंदारे, रा.सातेफळ, ता.जाफराबाद, जि.जालना 4) आकाश शंकर मोरे, रा.देऊळगाव राजा, ता.देऊळगाव राजा, जि.बुलढाणा (फरार) 5) बळीराम राऊसाहेब फुके, रा.उमरखेडा, ता.भोकरदण, जि.जालना (फरार) अशांनी मिळून केल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून पथकाने आरोपीचा शोध घेऊन विनोद विठठल काळे, वय 28, रा.लोणगाव, ता.भोकरदण, जि.जालना व अंकुश तेजराव खंदारे, वय 40 रा.सातेफळ, ता.जाफराबाद, जि.जालना अशांना ताब्यात घेतले.पथकाने गुन्हयाचे तपासात 1,28,780/- रू किंमत त्यात 18.80 क्विंटल सोयाबीन जप्त केले.
ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असून, गुन्हयाचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे