देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 सप्टेंबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दि.05/09/2026 रोजी यातील फिर्यादी विजय भाऊसाहेब शेळके, वय 41, रा.गुणवडी, ता.अहिल्यानगर हे श्रीगोंदा येथून घरी येत असताना टाकळी लोणार ते पिसोरे खांड जाणारे रोडवर आरोपी प्रतिक पाचपुते व इतरांनी फिर्यादी व साक्षीदार यांना आडवून त्यांना काठीने व लोखंडी टॉमीने मारहाण करून 50 हजार रूपयाची खंडणी मागीतली.फिर्यादीने रक्कम देण्यास नकार दिल्याने आरोपीतांनी त्यांचेकडी रोख रक्कम जबरीने काढुन घेतली.याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरनं 804/2026 बीएनएस कलम 309 (6), 189 (2), 191 (2), 190, 191 (3), 118(1), 115(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपींनी खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा केलेला असल्याने मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार अतुल लोटके, राहुल द्वारके, निळकंठ कारखेले, शाहीद शेख, बाळासाहेब नागरगोजे, अजिनाथ पाखरे, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, सागर ससाणे, मनोज साखरे अशाचे दोन पथके तयार करून आरोपीचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
गुन्हयातील मुख्य आरोपी प्रतिक गोकुळ पाचपुते हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार झाला होता. तपासास नेमलेले दोन्ही पथक बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा सातत्याने शोध घेत होते. आरोपी हा सातारा, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने नमूद जिल्हयात जाऊन आरोपीचा शोध घेतला. परंतु आरोपी हा वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने उपयुक्त माहिती मिळत नव्हती. पथकास दिनांक 17/09/2026 रोजी आरोपी प्रतिक गोकुळ पाचपुते, रा.काष्टी, ता.श्रीगोंदा हा शिंगवे तुकाई, ता.नेवासा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी सापळा रचुन 1) प्रतिक गोकुळ पाचपुते, वय 25, रा.काष्टी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.आरोपीस गुन्हयाचे तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा