सांत्वन
माजी आरोग्य समिती सभापती, माजी नगरसेवक अजयराव साळवे कुटुंबियांची आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली सांत्वनपर भेट


यावेळी आमदार तांबे यांनी कालकथित अजयराव साळवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत साळवे कुटूंबियांना धीर दिला. यावेळी त्यांच्या मातोश्री शांताबाई साळवे, पत्नी अनुराधाताई साळवे, गोपीनाथ साळवे (मुलगा ), निखिल साळवे, राहुल साळवे, देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे पत्रकार महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते अशोक पारधे, अविनाश शिंदे,सुजित साळवे, आदी उपस्थित होते.