सांत्वन

सामाजिक बांधिलकी जोपासणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुंबई दि.8 ऑक्टोबर – ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर हे आदर्श नटसम्राट कलावंत होते.त्यांच्या निधनाने सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिनेविश्वातील क्रांतिवीर व्यक्तिमत्व हरपले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राचे आणि संपूर्ण देशाचे कलाक्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे.
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी सिने क्षेत्र आपल्या अभिनयाने समृद्ध केले.त्यांनी सिनेमांत साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा संस्मरणीय झालेल्या आहेत.कलाकार म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण देशात प्रत्येकाच्या हृदयात अमीट अजरामर झालेले आहे. प्रहार ; परिंदा; क्रांतिवीर नटसम्राट असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने गाजले आणि सजले आहेत.त्यांना अभिनय क्षेत्रात अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पद्मश्री किताबाने भारत सरकारने त्यांच्या अभिनय कलेचा बहुमान केला आहे. सिनेमांत दाखविण्यात येणारे आदर्श क्रांतिकारी सामाजिक व्यक्तिमत्व नाना पाटेकर यांनी पडद्या बाहेर आणून समाजात प्रत्यक्ष जीवनात आदर्श वाटावेत अशी सामाजिक कामे केली.त्यात त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी केलेले काम अतुलनीय आहे.सामाजिक बांधिलकीतून त्यांनी नाम फाऊंडेशन द्वारे केलेले काम आदर्श आहे.
वैचारिक बैठक मजबूत असणारे नाना पाटेकर यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे होते.त्यांचा आवाज त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा अभिनय भारतीय सिने सृष्टीचे वैभव ठरले असून नाना पाटेकर सदैव संस्मरणीय राहतील अशी शिकभावना ना. रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे