सांत्वन

‘मला होता अजय साळवेंच्या कार्याचा होता गर्व, पण आता मला दिसणार नाही अजयपर्व’- नामदार रामदास आठवले अन्यायाविरोधात ठामपणे उभा राहणारा लढवय्या कार्यकर्ता गमावला; आठवले यांच्याकडून कुटुंबातील एका मुलाला शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन

  • अहिल्यानगर दि. 3 ऑक्टोबर (प्रतिनिधी)- नीलक्रांती चौक येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात दिवंगत रिपब्लिकन नेते अजय साळवे यांच्या जलदान विधीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजय साळवे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

    रामदास आठवले म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लढवय्ये पँथर व्यक्तिमत्त्वे प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामध्ये विजयकांत चाबुकस्वार,अशोक गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड,अजय साळवे, यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अजय साळवे यांचा स्वभाव शांत होता; मात्र अन्यायाविरोधात उभे राहताना त्यांची भूमिका नेहमीच ठाम असायची. स्वतःच्या कुटुंबापेक्षा पक्ष मोठा, पक्षाच्या विचारांपेक्षा समाजहित मोठे, या भावनेने त्यांनी काम केले. दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणारा आणि चळवळीत सक्रियपणे सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.

    “मला अजय साळवे यांच्या कार्याचा गर्व होता; मात्र आता अजय पर्व मला दिसणार नाही. आज येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अजय साळवे यांच्या कार्याचा अभिमान होता,” अशा भावना आठवले यांनी व्यक्त केल्या.

    पक्षाच्या वाटचालीत कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित करत आठवले म्हणाले की, माझ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, पक्षाचा प्रचार व प्रसार केला. या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच मला दिल्लीत जाऊन केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना अजय साळवे यांच्यासारखे कार्यकर्ते माझ्या पाठीशी नसते तर मला कोणी विचारले नसते. कार्यकर्त्यांची हीच खरी ताकद आहे.

    “आज अजय साळवे आपल्यात नाहीत. नीलक्रांती चौक सुन्न झाला आहे. त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे,” असे सांगत आठवले यांनी अजय साळवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    अजय साळवे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

    प्रास्ताविकात नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले की, अजय साळवे यांच्या निधनाने आंबेडकरी समाजामध्ये व रिपब्लिकन चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चळवळीशी प्रामाणिक राहून त्यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या एका मुलाला शासकीय सेवेत घेण्यासाठी पक्षाने तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

    यावेळी अजय साळवे यांच्या पत्नी अनुराधा साळवे, मुलगा रविराज साळवे, निखिल साळवे, राहुल साळवे यांच्यासह योगीराज संदानशिव,खंडागळे दाजी नगरसेवक सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, राज्य सक्रेटरी गौतम सोनवणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर , विजयराव वाकचौरे, श्रीकांत भालेराव,मुस्लिम आघाडीचे राज्याचे नेते मुस्ताक बाबा,राज्य प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे,सुवेंद्र थोरात, सुनील साळवे, प्रा. जयंत गायकवाड, गौतम घोडके,विजयराव भांबळ, परिमल निकम, कौशल जी गायकवाड , विशाल शेठ भिंगारदिवे ,सुनील क्षेत्रे, किरण दाभाडे, सिद्धार्थ आढाव, भिमा बागुल, अंकुश भैलूमे, पत्रकार महेश भोसले, सुरेश भिंगारदिवे, अखिल भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे, मार्केट कमिटीचे संचालक भाऊसाहेब ठोंबे प्रा. संजय लोखंडे ,जेष्ठ पत्रकार अशोक झोटिंग,पत्रकार महेश कांबळे, प्रेस फोटोग्राफर साजिद शेख,पत्रकार किरण बोरुडे,अविनाश शिंदे,प्रा.विलास साठे, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. भिमराव पगारे,प्रा. सतीशकुमार चाबुकस्वार,अमित काळे, विशाल कांबळे, संजय खामकर,

    कॉ. अनंत लोखंडे, गौतमी भिंगारदिवे, जयश्री गायकवाड, हेमाताई गायकवाड, माया जाधव, आरती बडेकर, शशिकांत वाघचौरे,प्रा. डॉ. हनुमंत गायकवाड, प्रा. एल. बी. जाधव,विशाल गायकवाड, विनोद भिंगारदिवे, प्रकाश साळवे, धम्ममित्र संजय भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते संजय बोरुडे, विनायक संभागळे,रवींद्र वाघचौरे, ऋषी विधाते, जीवन रोकडे, डॉ. प्रशांत साळवे सर, दया गजभिये, अजय पाखरे,राजेंद्र साळवे, माधवराव चाबुकस्वार, हर्षल गायकवाड, सदाशिव भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे,शैलेश पाचारणे, प्रवीण भिंगारदिवे, सारंग पटेकर, उदयोजक सुनील साळवे, वृषाल साळवे, अशोक पारधे, संदीप पारधे, सुशांत शिरसाठ, अक्षय वाघचौरे, रोहित उर्फ बंडू आव्हाड, मेहेर मिसाळ, देविदास जाधव, मेहेर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रबूद्ध कांबळे,सतीश साळवे, गणेश साळवे, संदेश भोसले, सुशांत भोसले, प्रा. व्ही. एम. बैचे,किरण पवार, कॉ. सुभाष लांडे, कॉ. प्रवीण सोनवणे,तुकाराम गायकवाड,मयूर पाचारणे, तेजस पाचरणे, क्रिश साळवे, मिलिंद साळवे, राहुल साळवे, शुभम जाधव, सुनील खरारे, विक्रम ओव्हळ, मेहेंद्र तांबे, विकास साळवे, आकाश साळवे, निखिल सूर्यवंशी, अजय भिंगारदिवे सर, राजू ससाणे,आदी उपस्थित होते. आभिवादन सभेचे सूत्रसंचालन पत्रकार महेश भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘अमर रहे, अमर रहे अजय साळवे अमर रहे’! च्या घोषणा देत पँथर अजय साळवे यांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे