सांत्वन

दोघांच्या गावाचे अंतर जरी दूर आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे’! निळ्या झेंड्याचा पाईक पँथर अजयराव साळवे यांच्या विषयी प्रा. जयंत गायकवाड यांचा विशेष लेख

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि 1 ऑक्टोबर : “माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे ” महाकवी वामनदादा पुढे काव्यात म्हणतात दोघांच्या गावाचे अंतर जरी दूर आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे’!
मित्रा काय लिहावे तुझ्या विषयी साळवे परिवाराच्या घरातूनच फुले, शाहू, आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीचा वसा व वारसा मिळालेला. वडील सुधाकर काका भाऊ बाळासाहेब यांच्याकडून आलेला वारसा सातत्याने तू पुढे नेलास घरातूनच चळवळीचे बाळकडू मिळालेले, डॉ. आंबेडकर म्हणतात जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवु शकत नाही.
“जुल्म करनेवालेसे जुल्म सहनेवाला ज्यादा गुनहगार होता है”!
अहिल्यानगर जिल्ह्यातील तळा गाळातील उपेक्षित, अत्याचारीत, अन्यायग्रस्त व्यक्तीला नगरमध्ये यायचे न्यायासाठी लढायचे हक्कासाठी लढायचे तर हक्काचे घर म्हणजे पॅन्थर अजयराव साळवेंचे!
असंख्य अडचणीना सोमोरे जाऊन उभा राहिलेले नेतृत्व अजय साळवे कुटूंबाची, घरादाराची पर्वा न करता सतत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेला हा पॅन्थर खऱ्या अर्थाने स्मृतीशेष विजयकांत चाबुकस्वार, बाळासाहेब चव्हाण, भैय्यासाहेब गायकवाड यांच्या कुशीतून, मुशीतून ताऊन – सुलाखून तयार झालेले नेतृत्व म्हणजे अजयराव!
पोटा पाण्याच्या संघर्षासाठी प्रसंगी आपल्या सवंगड्यांबरोबर पेंटिंग चे काम रिक्षा चालकाचे काम करीत अविरत चळवळीसाठी झटणारे निस्वार्थी नेतृत्व!
नामदार रामदासजी आठवले साहेबांचा खरा शागिर्द, शिलेदार, सच्चा भीमसैनिक अजयरावच्या चळवळीची सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच झाली. अखिल भारतीय विद्यार्थी संसदेतून हे नेतृत्व उमलू लागले. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढू लागले.मागासवर्गीय विदयार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न, फि वाढीचे प्रश्न, वसतिगृहाचे प्रश्न, असंख्य प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असायचे दलित ऐक्य परिषद, नामांतर लढा देण्यासाठी, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, रिडल्सचा मोर्चा याबाबत सर्वात अग्रेसर भूमिका असायची, टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे म्हूणन प्रसंगी लढा दिला. आपल्या सहकार्या समवेत प्रसंगी आमरण उपोषण केले.
महानगर पालिका नगरसेवक म्हणून चूरशीच्या लढाईत 11 मतांनी निवडून येत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरपालिकेत आल्यावर आरोग्य समिती सभापती होऊन अनेक प्रश्न मार्गी लावले. अनेक कामगारांना नोकरीला लावले. प्रसंगी कामगारांच्या प्रश्नावर देखील लढा दिला. 25-30 वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्यातून त्यांचा एक प्रकारे दुसरा जन्मच झाला. तदनंन्तर आयुष्यभर हा पँथर समाजाच्या प्रश्नासाठी लढत राहिला.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी चळवळीत नेहमीच अग्रणी राहिले.
मा. अरुणकाका जगताप यांचे बरोबर अतिशय घरगुती व जिव्हाळ्याचे संबंध राहिले तेच संबंध आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्याशी ठेवले आहेत. नगर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिलेला हा सच्चा भीमसैनिक रिपब्लिकन चळवळीतील सर्वच नेत्यांशी आपुलकीचे संबंध त्यात प्रा. जोगेंद्रजी कवाडे सरांशी अतिशय स्नेहपूर्वक संबंध राहिलेले.
निलक्रांती चौकात राष्ट्र पुरुष, समाज सुधारकांच्या जयंती, पुण्यतिथी साजरा करण्यात तुमचा आग्रह अविस्मरणीय राहील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे तुमचा उत्साह दांडगा, शहरात तर झालीच पाहिजे, परंतु निलक्रांती चौकातील भिममहोत्सव हा सर्वांच्या स्मरणात राहील असाच आग्रह असायचा! पैसे असो वा नसो प्रसंगी कर्ज काढून बँकेचे चेक देऊन कार्यक्रम केलेले हे विसरून चालणार नाही. चळवळ सांभाळत असतानाही प्रत्येक मित्रांशी प्रेमपूर्वक संबंध ठेऊन अजातशत्रू राहिलेला तू मित्रा, तुला अखेरचा जयभिम करतांना अंतकरण दाटून येत आहे. तुझे उर्वरित कार्य त्रिमूर्ती मुले पूर्ण करतील हिच अपेक्षा!
शेवटचा क्रांतीकारी जयभिम!
संपला वामन तयाचे गीत आता संपले…..
शब्दांकन
प्रा. जयंत गायकवाड(भीमसैनिक )
मो. नं. 7588115111

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे