देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दिनांक 8 ऑगस्ट: फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य कालकथीत अशोकराव गायकवाड यांचे 2 ऑगस्ट रोजी नगर शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सर्व सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या आभिवादन सभेस केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे तसेच भारतीय दलित कोब्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विवेक भाई चव्हाण हे उपस्थित राहणार असून सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन नगर मनमाड रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथे दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती समस्त आंबेडकरी चळवळीने कळविली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा