देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 9 ऑगस्ट : “जे नेहमीच म्हणायचे अन्यायाला गाड, त्यांचेच नावं होते अशोक गायकवाड” अशोक गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळीला आधार देण्यासाठी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले. जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांना आभिवादन करण्यासाठी सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार अक्षय कर्डीले, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष ऍड. विवेक भाई चव्हाण, महापालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अहिल्यानगर महानगर पालिकेचे नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी तोफखाना ते लॉयड कॉलेनी या रस्त्याला पॅन्थर अशोकराव गायकवाड यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महानगर पालिकेला देणार असल्याची घोषणा केली. शोकसभेचे अध्यक्ष रिपाईचे जेष्ठ नेते विजयराव वाघचौरे हे होते. यावेळी प्रा. निवृत्ती आरु, प्रा. विलास साठे, जल अभियंता परिमल निकम,मराठा महासंघांचे संभाजी दहातोंडे,संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, ऍड. संघराज रुपवते, माजी नगरसेवक अजय साळवे, विजयराव भांबळ, ऍड. वाल्मीक तात्या निकाळजे, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, शिवाजी साळवे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भिमराव पगारे, पद्मश्री पोपटराव पवार,रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, रिपाईचे नेते सुरेंद्र थोरात,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,कॉ. महेबूब सय्यद, प्रा. ना. म. साठे, नाथाभाऊ आल्हाट, ऍड. अभयाताई सोनवणे, पत्रकार महेश भोसले, सुरेश भिंगारदिवे, डॉ. शशिकांत पाचारणे, प्रा. विलास साठे, प्रा. सतीशकुमार चाबुकस्वार, अजय भिंगारदिवे, संजीवन साळवे, विशाल गायकवाड, विशाल भिंगारदिवे,विशाल कांबळे,रिपाईचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे, सारंग पटेकर, पोपट सरोदे, (शेवगाव ), पंचशील विद्यामंदिरचे शेखर उंडे, सुजित घंगाळे, यशवंत भांबळ, दिपक अमृत, संजय भिंगारदिवे, संभाजी भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, रावसाहेब निकाळजे (शेवगाव ), बाजीराव भिंगारदिवे,राजाभाऊ कापसे, भिमराव बागुल, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. प्रमोद सूर्यवंशी,प्रा. एल. बी. जाधव, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, जयश्री गायकवाड , प्रा. हनुमंत गायकवाड, माया जाधव, लता बर्डे, सारिका गांगुर्डे, हेमा गायकवाड, शकुंतला लोखंडे, रजनीताई ताठे, भीमराव जाधव, शनेश्वर पवार, दया गजभिये, निखिल सूर्यवंशी, महेश अंगारखे, चंद्रकांत ठोंबरे, ऋषी विधाते, राहुल नवगिरे, निखिल साळवे, राहुल साळवे, अमर बडेकर, शिवाजीराव भोसले, महेंद्र राजगुरू, किरण गायकवाड, अतुल सोनवणे, प्रवीण सोनवणे, अजय पाखरे, नाना पाटोळे, चंद्रकांत वाघचौरे, चंद्रकांत कर्डक, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, विशाल ,सिद्धांत उर्फ चिकू गायकवाड,अनिकेत विधाते,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आठवले पुढे म्हणाले, अशोक गायकवाड काही दिवस माझ्या पक्षातून दूर गेले होते, परंतु गेल्या चार महिन्यापासून ते आमच्याकडे आले होते. व त्यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी आम्ही देणार होतो. सम्राट अशोका प्रमाणे तेही अहिल्यानगरचे सम्राटच होते. अहिल्यानगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून अशोक गायकवाड यांचे स्मारक व्हावे, यासाठी मी माझ्या निधीतून मदत द्यायला तयार असून राज्याने देखील मदत करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अशोक गायकवाड अमर रहे च्या घोषणा देत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. अंनत लोखंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. जयंत गायकवाड यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा