देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : नेवासा :दि. 9 सप्टेंबर : नेवासे येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम बर्डे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्कच्या नेवासा तालुका प्रतिनिधी निवड करण्यात आली. यावेळी देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक महेश भोसले, उपसंपादक सुरेश भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा तथा शांतता कमिटी सदस्या गौतमी भिंगारदिवे यांच्या हस्ते बर्डे निवडीचे ओळख पत्र प्रदान करण्यात आले.
तसेच त्यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उत्तम बर्डे यांच्या पत्नी शोभा बर्डे, लता बर्डे, विजय बर्डे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा