सामाजिक

प्रामाणिक परिश्रम केल्यास फळ निश्चित मिळते- सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा दि अहमदनगर प्रेस अँड अलाईड ऑनर्स असो. च्या उपाध्यक्षपदी विनय गुंदेचा यांची निवड झाल्या बद्दल सन्मान

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 10 ऑक्टोबर : नगर -दि अहमदनगर प्रेस अँड अलाईड ऑनर्स असोशियन अहिल्यानगर च्या उपाध्यक्षपदी उद्योजक विनय गुंदेचा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संवाद प्रतिष्ठान अहिल्यानगर चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संवाद प्रतिष्ठानचे नरेश कांबळे ,संजय भालेराव, आदिनाथ भोसले, संजय सायगावकर, रवींद्र काळे, रवींद्र लोखंडे, गोवर्धन जाधव,कुलकर्णी साहेब व गणेश दाणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीनिवास बोज्जा म्हणाले विनय गुंदेचा यांचे कार्य कौतुकास्पद असून कमी वयात त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव लौकिक केले असून सामाजिक बांधिलकी या नात्याने त्यांनी संवाद प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य निस्वार्थ पणे केलेले आहे म्हणूनच त्यांच्या कामाची व कार्याची पावती म्हणूनच त्यांची असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली, प्रामाणिक परिश्रम केल्यास फळ निश्चित मिळते याचेच एक उदाहरण आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना विनय गुंदेचा म्हणाले माझी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने माझी जबाबदारी वाढली असून मी असोसिएशन च्या प्रत्येक सभासदास न्याय मिळवून देण्यासाठी व असोसिएशन च्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करेल, माझा आजचा सन्मान नक्कीच माझी ऊर्जा वाढण्यास मदत होईल.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत नरेश कांबळे यांनी केले तर आभार आदिनाथ भोसले यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी केले या वेळी संवाद प्रतिष्ठान चे इतर सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे