कौतुकास्पद

अहिल्यानगर पोलीस दलाने राबविले ऑपरेशन ऑल आऊट अवैध धंदे, वाहतुक केसेस व सराईत गुन्हेगारांवर पोलीसांची धडक कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर, दि. 10 ऑक्टोबर : मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला दिनांक 09/10/2026 रोजी 23.00 पासुन ते दिनांक 10/10/2026 रोजी 05.00 वा. दरम्यान ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आदेश दिले.
ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी आयोजीत करून वाहन तपासणी, ड्रंक ऍ़ण्ड ड्राइव्ह केसेस तसेच फरार पाहिजे आरोपी, हद्दपार केलेले आरोपी, नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी, हिस्ट्रीशीटर चेक करणेबाबत आदेश दिले.त्याचप्रमाणे ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अवैध अग्निशस्त्र बाळगणारे, अवैध धंदे करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर असे एकुण 57 पोलीस अधिकारी, 207 पोलीस अंमलदार व 101 होमगार्ड यांचेकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये खालीलप्रमाणे कारवाई केली आहे.
अ.क्र. केलेली कारवाई कारवाईची संख्या
1 नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी 1136
2 वाहन नियम उल्लंघन केसेस 226
3 ड्रंक ऍ़ण्ड ड्राईव्ह केसेस 12
4 हद्दपार केलेले आरोपी चेकींग 50
5 नॉन बेलेबल वॉरंट बजावणी 82
6 हॉटेल/लॉजींग चेकींग 255
7 सराईत गुन्हेगार चेकींग 159
8 अवैध धंदे कारवाई 23
9 फरार आरोपी अभिलेखावरून कमी 20
10 पाहिजे आरोपी अभिलेखावरून कमी 36
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व मा.श्री.सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे