ब्रेकिंग

मोक्कातील फरार आरोपी दरोडयाच्या तयारीत असताना स्थनिक गुन्हे केले जेरबंद

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर, दि. 18 नोव्हेंबर : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीसa अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, भिमराज खर्से, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, दिपक जाधव व जालींदर साखरे अशांचे पथक नेमून पेट्रोलिंगबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 17/11/2026 रोजी पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, राशीन ते चिलवडी जाणारे रोडने मोटार सायकलवरून काही इसम हे दरोडा टाकण्याचे उद्देशाने जात आहेत.मिळालेल्या माहितीवरून पथकाने राशीन ते चिलवडी जाणारे रोडवर पिराच्या माळावर सापळा रचुन थांबले असता तीन संशयीत मोटार सायकलवरून काही इसम येत असताना त्यांना इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते मोटार सायकल टाकून पळून जाऊ लागले. पथकाने पाठलाग करून 1) बाक्या बंडया काळे, वय 39, रा.आखोणी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 2) गोटया बंडू काळे, 25, रा.आखोणी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 3) धोंडया ईश्वर भोसले, वय 28, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन पळून गेलेल्या इसमांची विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्यांची नावे 4) शुभम गहिनीनाथ भोसले, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार) 5) रोहित नितीन चव्हाण, रा.केडगाव, ता.अहिल्यानगर (फरार) 6) सुमित नितीन चव्हाण, रा.केडगाव, ता.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.
पथकाने तपासकामी घटनाठिकाणाहुन 2,41,500/- रू किं.त्यात 3 मोटार सायकल, 3 मोबाईल, 1 कटावणी, 1 पान्हा, मिरची पुड, एक कोयता, 1 स्क्रु ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले असून आरोपीविरूध्द कर्जत पोलीस स्टेशन गुरनं 615/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (4), 310 (5), 310 (6) सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
ताब्यातील आरोपी  धोंडया ईश्वर भोसले, वय 28, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर हा दौंड पोलीस स्टेशन जि.पुणे गुरनं 435/2025 या गुन्हयात फरार आरोपी असून नमूद गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम लावण्यात आलेले आहे.
वरील मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे