गुन्हेगारी

अवैध वाळु वाहतुकीविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीसह 11,15,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर, दि. 18 नोव्हेंबर :मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार विजय पवार, आजिनाथ पाखरे व  रणजीत जाधव अशांना अवैध धंदयाची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून रवाना केले.
दिनांक 18/11/2026 रोजी पथक राहुरी हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, बर्डे वस्ती, कोल्हार खुर्द गावचे शिवारात प्रवरा नदीपात्रातून काही इसम चोरून वाळुची वाहतुक करत आहेत..पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी जाऊन खात्री केलीअसता बर्डे वस्तीजवळ रस्त्याने एक अशोक लेलंड व टाटा कंपनीचे टेम्पो येताना दिसल्याने त्यास थांबवून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये वाळू मिळून आल्याने 1) जालींदर राजेंद्र लकारिया, वय 28, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर 2) अक्षय सुनिल लकारिया, वय 26, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर व 3) अजय रंजित लकारिया, वय 26, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीचे कब्जातून 5,00,000/- रू किं. त्यात विना क्रमांकाचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो, 6,00,000/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा विना क्रमांकाचा टेम्पो व 15,000/- रू किंमतीचा वाळु असा एकुण 11,15,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.वर नमूद आरोपीविरूध्द राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 1290/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे