न्यायालयीन

अल्पवयीन मुलीला पळवून नेवून अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्त-मजुरीसह कैदेची शिक्षा!

कर्जत (प्रतिनिधी) : दि १६ जुलै
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी तीन आरोपींना कर्जत न्यायालयाने सक्तमजुरीसह कैदेची शिक्षा सुनावली आहे. फिरोज चाँद मुलाणी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव (सर्व रा. दुरगाव ता.कर्जत) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असून कर्जत न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे. दि.१ जुन २०२१ रोजी हा प्रकार घडला होता.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरगाव (ता.कर्जत) येथील अल्पवयीन पीडितेला फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेत तिला बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे भाड्याच्या खोलीत ठेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केला होता. या प्रकरणात आरोपीला मुलगी पळवून नेण्यासाठी टेम्पो गाडी उपलब्ध करीत पळवून नेण्यासाठी मदत केली होती. याबाबत महिला फिर्यादी यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीवरून मुख्य आरोपीवर भा.द.वी कलम ३७६ (२),(जे),(आय) ३६३,पोस्को ३,४,१६,१४ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी फिरोज मुलाणी यावर ३७६ (२) (एन) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद. तसेच भा.द.वी कलम ३६३अन्वये ३ वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर त्याला मदत करणारे आरोपी ओंकार शिवाजी कुलथे, अतुल बाळू आढाव यांच्यावर भा.द.वी कलम ३६३ अन्वये ३ वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला होता.सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अड पुष्पा कापसे यांनी काम पाहिले त्यांना अड सुमित पाटील यांनी फिर्यादीच्यावतीने सहकार्य केले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. कोर्ट भैरवी अधिकारी आशा खामकर नाना दरेकर यांनी चांगल्या पद्धतीने काम पाहिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे